अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याबरोबर जल बोर्ड प्रकरणातही ईडीची नोटीस

17 Mar 2024 14:00:07
दारू घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना ९वी नोटीस पाठवली आहे. जल बोर्ड प्रकरणातही त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.
  
arvind kejrival ed

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल अरविंद केजरावाल ( Arvind Kejriwal ) यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात केजरीवाल यांना पाठवली गेलेली ९वी नोटीस आहे. या नोटीस बरोबरच केजरीवाल यांना दिल्ली जल बोर्ड प्रकरणातही नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने २१ मार्च २०२४ रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. शनिवार १६ मार्च ला सीएम अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने त्यांना मागील समन्सवर हजर न राहिल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. ईडी सतत केजरावाल यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवत आहे. पण ते आजपर्यंत एकदाही चौकशीसाठी हजर राहीले नाहीत.
 
हे वाचलत का ?- मशिद पाडलेल्या जागी नमाज पढण्याची मागणी; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
 
आम आदमी पार्टी च्या म्हणण्यानुसार ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने अटक करू इच्छित आहे, जेणेकरून ते लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत. दुसरीकडे ईडीचे म्हणणे आहे की, ते लाचखोरीच्या आरोपांवर केजरीवाल यांचे साक्ष नोंदवू इच्छित आहेत.
 
अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी अरविंद केजरीवाल यांना 2 नोटिसा पाठवल्या आहेत. यातील पहिली नोटीस दिल्ली जल बोर्ड प्रकरणाची आहे. तर दुसरी नोटीस दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित आहे. दिल्ली जल बोर्डाकडुन अरविंद केजरीवालांना पाठवण्यात आलेली नोटीस त्यांच्यासाठी नविन अडचण मानली जात आहे.
 
हे वाचलत का ?- काँग्रेस नसती तर भारताचे...; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्यं
 
दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आप पक्षाचे नेते आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांना नव्या प्रकरणात अडकवण्याचा हा कट असल्याचे म्हटले आहे. तर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी ईडीच्या तपासाबाबत 'आप'चे वक्तव्य आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल निर्दोष असतील तर ते तपासापासून का पळत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Powered By Sangraha 9.0