आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाका

16 Mar 2024 17:24:17
 
 
 

vishwanath bhior  
कल्याण  : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी भरघोस असा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत विविध प्रकारच्या नागरी आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू होता. ज्यामध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यापासून ते जलवाहिनीपर्यंतच्या मूलभूत विकासकामांचा समावेश आहे.
वाहतूक पोलिसांसाठी कुलरचे वाटप...
सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेतील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना शनिवारी कुलरचे वितरण करण्यात आले. त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले.
रौनक सिटी ते कल्याण स्टेशन बससेवा सुरू...
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण स्टेशनला जाण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने केडीएमटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या बस सेवेमुळे इथल्या हजारो नागरिकांचा त्रास वाचणार आहे.
जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी...
आधारवाडी जेल परिसरातील जलकुंभातून कल्याण पश्चिमेतील जवळपास अर्ध्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत 60 लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उपलब्ध करून दिलेल्या निधीबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी आणि डॉ. धीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0