ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

16 Mar 2024 14:05:09
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचे राजकारणात पाऊल
 

anuradha paudwal 
नवी दिल्ली : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल (Anujaradha Paudwal) यांनी आज १६ मार्च रोजी भाजप (BJP) पक्षात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणूक समोर असताना अनुराधा यांनी हाती कमळ (BJP) घेतले आहे. अनुराधा पौडवाल यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि  मीडिया प्रमुख अनिल बालून उपस्थित होते.
 
 
 
पत्रकार परिषदेत बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "सनातन धर्माशी खोलवर संबंध असलेल्या सरकारमध्ये मी सहभागी होत आहे याचा मला आनंद आहे. आज मी भाजपमध्ये सामील होत आहे हे माझे भाग्य आहे." 
 
आजवर अनुराधा पौडवाल यांनी ९०च्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील प्रेमगीतांसोबतच भक्तीगीते, भावगीते गात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या संगीतप्रवासासोबतच त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर नवा राजकीय प्रवास सुरु झाला आहे.
Powered By Sangraha 9.0