ठाकरे गटात आणखी एक भुकंप होणार? 'हा' बडा नेता नाराज

16 Mar 2024 11:51:46

Thackeray & Raut


मुंबई :
उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दानवेंना लोकसभा निवडणूक लढवण्याची ईच्छा असून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
 
छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, अंबादास दानवेंनीही पक्षाकडे लोकसभेची तिकीट मागितली आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
याबाबत अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंकडे मी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते याबाबत निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असणारा शिवसैनिक आहे. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात. पण मी त्यांच्यासाठी काम करत नाही तर उद्धव ठाकरेंसाठी पक्षाचं काम करतो. त्यामुळे मी कधीही शिंदे गटात जाणार नाही," असेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0