पुन्हा एकदा 'मालवणी पॅटर्न', गुंड इन्कलाब खानच्या घरावर बुलडोझर

15 Mar 2024 22:16:24
Inqlab Khan Home action



मुंबई :   कुर्ला-जरीमरी भागातील हिंदू बांधवांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंड इन्कलाब खानचे घर तात्काळ जमीनदोस्त करण्याचे निर्देश शुक्रवार, दि. १५ मार्च रोजी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. त्यानुसार, पालिकेच्या 'एल' विभागाने कारवाई सुरू केली असून, संबंधित पाच मजली अनधिकृत बांधकाम रात्रीत पडले जाईल, अशी माहिती 'एल' विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी दिली.


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिंतीला लागून इन्कलाब खान या गुंडाने अतिक्रमण करीत पाच मजली अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामालगत हिंदू मंदिर आहे. आसपासचे हिंदू बांधव नित्यनेमाने पूजा करण्यासाठी तेथे येतात. मात्र, इन्कलाब याने गेल्या काही दिवसांपासून या मंदिरात पूजा आणि आरती करणाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यास सुरुवात केली. महाशिवरात्रीवेळी मंडपाचा पडदा कापला, मंदिरातील नंदी तोडला.




या गुंडाशाही विरोधात स्थानिकांनी तब्बल ४० तक्रारी दाखल केल्या. परंतु, पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला. गुरुवार, दि. १४ मार्च रोजी स्थानिक पुन्हा पोलिसांत गेल्याचा राग मनात धरून इन्कलाब खानने परिसरातील हिंदू नागरिकांवर चाकू सूऱ्यांसह जीवघेणा हल्ला केला. यात ५ जण गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवाज उठवताच पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी इन्कलाबच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्याच्यावर ३०७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.



रात्रीत पाडका
Type text here
म पूर्ण होणार


या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी पीडित हिंदू बांधवांची भेट घेतली. इन्कलाब खान या गुंडाने अतिक्रमण करून उभारलेले पाच मजली अनधिकृत बांधकाम तात्काळ पडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, रात्रीत पाडकम पूर्ण केले जाईल, असे 'एल' विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी सांगितले. दरम्यान, लोढा यांनी जखमींशी संवाद साधला, तेथील मंदिराचे दर्शनही घेतले. साकीनाका पोलीस ठाण्याला भेट देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे मंदिरातील पुजाऱ्यावर हात उचलणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची सूचना केली.


एका पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे पोलीस खाते बदनाम होऊ नये, याची काळजी घेऊ. ज्या पोलिसाने पुजाऱ्यावर हात उचलला, त्याच्यावर महाराष्ट्र शासन शिस्तीचे नियम अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. चार दिवसांत त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर केला जाईल.
- मंगेश शिंदे, पोलीस उप अधीक्षक








Powered By Sangraha 9.0