Critics Choice Awards 2024 : '12th Fail' सर्वोत्कृष्ट चित्रपट तर विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता

15 Mar 2024 18:42:19
'क्रिटिक्स चॉईस पुरस्कार' २०२४' पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला असून या विजेत्यांच्या यादीत एका मराठी अभिनेत्रीचेही नाव आहे.
 

12th fail 
 
मुंबई : काही दिवसांपुर्वी ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता. यात जरी भारतीय चित्रपटांना एकही पुरस्कार मिळाला नसला तरी नुकत्याच संपन्न झालेल्या 'क्रिटिक्स चॉईस पुरस्कार २०२४' (Critics Choice Awards) सोहळ्यात भारतीय चित्रपटांनी यशस्वी बाजी (Critics Choice Awards) मारली आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या ‘बारावी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रात मेस्सी याला मिळाला आहे.
 
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती. यात ‘कॉफी विथ करण’साठी सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून करण जोहरला आणि डिस्नी हॉट स्टारला सर्वोत्कृष्ट ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून पुरस्कार देण्यात आला. जाणून घेऊयात इतर विभागातील क्रिटिक्स चॉईस पुरस्कारांचे मानकरी कोण ठरले आहेत?
 
चित्रपट विभाग
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रात मेस्सी (१२ वी फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शेफाली शाह ( थ्री ऑफ अज)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – १२ वी फेल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : जयदीप अहलावत (जाने जाँ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दीप्ती नवल (गोल्डफिश)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : पीएस विनोथराज (तमिळ चित्रपट : कूझंगल (पेबल्स))
सर्वोत्कृष्ट लेखक : देवाशिष माखिजा (जोरम)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर : अविनाश अरुण (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट संकलक : अभ्रो बॅनर्जी (जोरम)
 
वेबसीरिज विभाग
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुविंदर विक्की (कोहरा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर)
सर्वोत्कृष्ट वेबसीरिज - कोहरा
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : सिद्धांत गुप्ता (ज्युबिली)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अमृता सुभाष (लस्ट स्टोरीज सीझन २)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विक्रमादित्य मोटवानी (ज्युबिली)
सर्वोत्कृष्ट लेखक - गुरजित चोप्रा, दिग्गी सिसोदिया, सुदीप शर्मा (कोहरा)
 
लघुपट विभाग
 
सर्वोत्कृष्ट लघुपट : नॉक्टरनल बर्गर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : रीमा माया (नॉक्टरनल बर्गर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : संजय मिश्रा (गिद्ध - द स्कॅव्हेंजर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिलो सुंका (नॉक्टरनल बर्गर)
सर्वोत्कृष्ट लेखन : अशोक सांखला आणि मनीष सैनी (गिद्ध - द स्कॅव्हेंजर)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जिग्मेट वांगचुक (लास्ट डेज ऑफ समर)
Powered By Sangraha 9.0