“बॅगचं फक्त हॅन्डल राहिलं बाकी...”, सिद्धार्थने इंडिगो एअरलाईन्सला सुनावले खडे बोल

14 Mar 2024 13:45:28
अभिनेता सिद्धार्थ जाधव इंडिगो एअरलाईन्सवर चांगलाच भडकला असून मुंबई-गोवा प्रवासादरम्यान त्याच्या सामानाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 
 
siddharth jadhav
 
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतला स्टार आहे. नुकताच तो ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटात झळकला होता. दरम्यान, सिद्धार्थने त्याच्या सोशल मिडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो विमानाने (Indigo Airlines) मुंबईहून गोव्याला गेला असता त्याच्या सामानाची प्रचंड नासधुस झाल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत त्याने इंडिगो एअरलाईन्सला (Indigo Airlines) चांगलीच शाब्दिक चपराक देत केवळ माझ्या बॅगचं हॅन्डल ठेवलं असं देखील त्याने उपहास्मकरित्या म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? - IFFI च्या रेड कार्पेटवर सिद्धार्थ जाधवचा दिग्गजांबरोबर झाला सन्मान  
 
व्हिडिओत काय म्हणाला सिद्धार्थ जाधव?
 
"मी आता इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी माझ्या सामानाची हॅन्डल विथ केअर केली आहे. म्हणजे जवळजवळ त्यांनी फक्त हँडलच बाकी ठेवला आहे. बाकी केअर तर तुम्हाला दिसतच आहे. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या सामानाची काळजी घेतली आहे. ते पाहून मला खूप छान वाटलं. आता मी आणखी काय बोलू...वाह."
 
 
 
दरम्यान, यापुर्वी देखील इंडिगो एअरलाईन्समुळे सामान्य प्रवाशांसह हिंदी कलाकारांना देखील विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. सिद्धार्थच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास नुकताच तो मयुरी देशमुख आणि भूषण प्रधान यांच्यासोबत ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटात झळकला होता. तर प्रथमेश परब सोबत तो आगामी ‘सुस्साट...’ चित्रपटात देखील झळकणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0