जेएसके बिझिनेस स्कूलचा 'मंथन उपक्रम'

14 Mar 2024 22:17:37
JSK Business School News

मुंबई : भावी सिनेस लीडर्स घडवताना आजूबाजूला असणार्‍या सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, या उद्देशाने जयश्री शरदचंद्र कोठारी (जेएसके) बिझनेस स्कूल या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूलने आयोजित ‘मंथन’ या उपक्रमाचा समारोप नुकताच दादर येथील किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा (डीईएस) भाग असणार्‍या जेएसके िझिनेस स्कूलने व्यवस्थापन कौशल्यासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविला होता. या अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा.स्व.सं.) जनकल्याण समितीच्यामार्फत विविध सेवा वस्त्यांमध्ये चालणार्‍या ‘माता-बाल आरोग्य सेवा’ या सेवाकार्यास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तिथे काम करणार्‍या सेवाव्रतींशी तसेच स्थानिक लाभार्थ्यांची संवाद साधला.

जनकल्याण समितीच्या माध्यमातून चालणार्‍या या उपक्रमाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमितीय संशोधन आराखड्याच्या साहायाने विश्लेषण केले. यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष त्या वस्त्यांवर जाऊन संवाद साधला. आपली निरीक्षणे नोंदविली. प्रत्यक्ष पाहणी, मुलाखत, निरीक्षणे, या सर्वांचा साकल्याने अभ्यास करून याचा एक सविस्तर विवेचनात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे.“उद्याच्या बलशाली भारताचे भविष्य असणार्‍या या युवा वर्गाचा सामाजिक उपक्रमातील सहभागाचा हा समारोप नव्हे तर सुरवात ठरावी,” असा विश्वास नाना पालकर स्मृती समितीचे विश्वस्त शरद खाडिलकर यांनी समारोप कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केला. डीईएसचे ट्रस्टी निल हेलेकर यांचा प्रोत्साहनाने सुरु झालेल्या या उपक्रमाची जेएसके बिसनेस स्कूलच्या संचालिका डॉ. गिरीबाला देवस्थळे यांनी शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण आखणी केली होती. यावेळी जनकल्याण समितीचे संदीप वेलिंग, डॉ. अजित मराठे, सहदेव सोनावणे, संजय माळकर तसेच डीईएसच्या कौन्सिल मेम्बर उषा मराठे, कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. पवार, उप-प्राचार्या डॉ. मीनल मापुसकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0