(ABPS Nagpur Pradarshani)
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार. दि १५ मार्च रोजी रेशिमबाग येथील 'स्मृतीभवन' संकुलात सुरुवात होत आहे. तत्पूर्वी प्रतिनिधी सभेच्या महर्षी दयानंद सरस्वती सभागृहाच्या प्रांगणात एक प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या प्रदर्शनीचे उद्घाटन सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आणि सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार, आलोक कुमार हे देखील उपस्थित होते. प्रदर्शनीमध्ये भारतीय संस्कृतीची झलक देणाऱ्या प्रतिकृती, पूर्व प्रचारकांच्या चरित्रांचे परिचय फलक, डायग्नोस्टिक सेंटर, सेवा विभाग आणि लोककल्याण समितीच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. यात पर्यावरण, समरसता, महाविद्यालयीन आयाम, स्वावलंबी भारत अभियान आणि विविध सेवा संस्थांच्या उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.