‘दुनियादारी’ चित्रपट आजही ११ वर्षांनंतर लोकप्रिय आहेच. या चित्रपटाबद्दल अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने महत्वाचा खुलासा केला आहे.
मुंबई : २०१३ साली प्रदर्शित झालेला संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपट आजही तरुणांना आपलासा वाटतो. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. चित्रपटातील प्रत्येक पात्र तरुणाईला आपलीशी वाटत होती. यातील एक पात्र म्हणजे शिरीनचं (Sai Tamhankar). अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने ती भूमिका साकारली होती. पण त्यापुर्वी ही भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) ऑफर करण्यात आली होती असे तिनेच मित्रम्हणेच्या मुलाखतीत म्हटले.
हे वाचलंत का? - “सुरुवातीला सई ताम्हणकर सई वाटायचीच नाही”, श्रेयाने सांगितला मिमिक्रीचा अनुभव
तेजस्विनी म्हणाली की, “दुनियादारी चित्रपट माझा होता, शिरीनचा रोल देखील माझा होता. १६ डिसेंबरला माझं लग्न होतं. २० पासून दुनियादारी चित्रपटाचं शूट होतं. संजय जाधव यांनी मला मेंदी काढायची नाही असं सांगितलं होतं. मी माझं लग्न असताना मेंदी देखील काढली नव्हती. पण दुसऱ्यादिवशी बाबांनी सकाळी पेपरमध्ये दुनियादारीची बातमी वाचली, त्यात माझं नावचं नव्हतं. त्यानंतर मी सगळ्यांना फोन करून विचारलं विचारलं पण कुणीच नीट उत्तरं दिली नाहीत. आणि आजही माझा तो प्रश्न अनुत्तरीत आहे, असं तेजस्विनी म्हणाली.
‘दुनियादारी’ या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, वर्षा उसगावकर, संदीप कुलकर्णी अशी कलाकारांची फौज झळकली होती. या चित्रपटातील प्रत्येत पात्र, गाणी ही तरुण पिढीला आपली वाटत होती आणि याच कारणामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.