श्री करणी फॅबकॉम आयपीओचे वितरण सुरू झाले ग्रे मार्केटमध्ये ' ही' असणार किंमत

13 Mar 2024 18:06:42

SKF
 
मुंबई: श्री करणी आयपीओ फॅबकॉमचे समभाग वितरण ( Share Allotment ) ठरले आहे. ज्यांनी या आयपीओला गुंतवणूक केली असेल ते संकेतस्थळावर जाऊन समभागावंरील अपडेट पाहू शकतात. सबस्क्रिप्शनसाठी तिसऱ्या दिवशी श्री करणी आयपीओ २९६.४३ वेळा सबस्क्राईब झाला आहे.अपात्र अथवा रद्द केलेल्या शेअर्सचा परतावा (Return) करण्याची प्रक्रिया कंपनीने आजपासून सुरू केली आहे.
 
ज्यांना शेअर मिळाले आहे त्यांच्या डिमॅट खात्यात हे आज जमा होणार आहेत.या कंपनीचा आयपीओ उद्या १४ तारखेला बाजारा लिस्टिंग (नोंदणीकृत) होईल.
 
ग्रे मार्केटमध्ये हा समभाग २१० रूपये प्रति समभाग दराने विकला जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. आयपीओच्या तुलनेत हा समभाग ४३७ रूपये प्रति समभाग मिळू शकतो.बाजारात आयपीओ येताना या समभागांची मूळ प्राईज बँड २२० ते २२७ रूपये प्रति समभाग ठेवण्यात आली होती.
 
Powered By Sangraha 9.0