लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का! राज्याच्या प्रभारीनीच दिला राजीनामा

13 Mar 2024 15:43:02
 AJAY KAPUR
 
लखनौ : लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे मोठे नेते अजय कपूर यांनी काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सचिवपद भूषवले असून ते बिहारचे सहप्रभारी आणि माजी आमदारही होते.
 
अजय कपूर हे उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्हातील मोठे नेते आहेत. अजय कपूर याआधी किदवई नगर आणि गोविंद नगर विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार झाले होते. दि. १२ मार्च २०२४ रोजी त्यांनी त्यांच्या समाज माध्यामावरुन काँग्रेस नेते असल्याची माहिती काढून टाकली होती. आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ही राजकीय जीवनाची नवी सुरुवात असल्याचे म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  'ममतां'चा CAA लागू करण्यास नकार! राज्यांना असं करण्याचा अधिकार आहे का? काय सांगते घटना...
 
ते म्हणाले, “देशाचे पंतप्रधान आणि जागतिक किर्तीचे नेते नरेंद्र मोदीजींच्या कुटुंबात सामील होताना मला खूप आनंद झाला आहे. मी ३७ वर्षे काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले. पण आज प्रत्येक भारतीय नागरिकाला मोदीजींच्या कुटुंबात सामील होऊन देशाच्या विकासात सहकार्य करावे असे वाटत आहे."
 
अजय कपूर हे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे एक मजबूत नेते मानले जात होते, जे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय कपूर यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0