मुंबई: काल सांख्यिकी संचालनालयाच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे मार्चमध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) ५.१० वरुन ५.९ टक्क्यांवर आला होता.याच धर्तीवर एसबीआय रिसर्चने किरकोळ महागाईबाबत नवा अहवाल सादर केला आहे.रिपोर्टमध्ये या महिन्यात किरकोळ महागाई दर पाच टक्क्यांहून थोडा राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
यातील माहितीनुसार, कोर महागाई (Core Inflation) दर गेल्या ५२ महिन्यातील सर्वात कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला होता.एसबीआय रिसर्च अहवालात महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात महागाई असल्याचे स्पष्ट केले आहे.
या रिपोर्ट (अहवाला) नुसार किरकोळ महागाई दर में पर्यंत ५ टक्क्यांवर राहु शकतो त्यानंतर जुलै महिन्यात तो दर घटून ३ टक्क्यांवर जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. अन्न, अंडी, मटण यातील महागाई दर ४०० ते ५०० बेसिस अंशाने वाढला आहे. डिसेंबर महिन्यात महागाई दर चार महिन्यांत ५.६९ टक्के इतका सर्वाधिक होता.महागाईचा दर वाढला असला तरी आरबीआयच्या टोलरंस लेवल (Tolerance Level) चा २ ते ६ टक्के पातळीमध्ये अंतर्भूत आहे.
अहवालातील मुद्यावर महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यांच्या विशेष उल्लेख केला असुन देशभरातील महागाईत या दोन राज्यात सर्वाधिक किरकोळ महागाई दर नोंदवला गेला.