मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून काही जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यावेळी लोकसभेकरिता महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य या बैठकीत उपस्थित होते. महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप केंद्रीय निवडणूक समितीने खालील नावांना मान्यता दिली आहे.
नागपूर - नितीन गडकरी
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
भिवंडी - कपिल पाटील
नंदुरबार - हीना गावित
अकोला - अनुप धोत्रे
पुणे- मुरलीधर मोहोळ
जालना - रावसाहेब दानवे
माढा - रणजीत नाईक- निंबाळकर
पंकजा मुंडे - बीड
पियुष गोयल - उत्तर मुंबई
मुंबई उत्तर पूर्व - मिहीर कोटेचा
रावेर - रक्षा खडसे
जळगाव - स्मिता वाघ
धुळे - डॉ. सुभाष भामरे
दिंडोरी - डॉ. भारती पवार
लातूर - सुधाकर श्रृंगारे
सांगली - संजयकाका पाटील
नांदेड - प्रताप चिखलीकर
वर्धा - रामदास तडस
अहमदनगर - डॉ. सुजय विखे-पाटील
या विद्यमान चार खासदारांच्या जागी नवे उमेदवार देण्यात आले आहेत.
गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई )
उन्मेष पाटील (जळगाव )
प्रितम मुंडे (बीड )
मनोज कोटक (उत्तर पूर्व मुंबई)