मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा! हरियाणात खांदेपालटाचा निर्णय

12 Mar 2024 11:58:09
 KHATTAR
 
चंदीगढ : हरियाणाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. येथे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी मंगळवारी हरियाणा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगड येथील हरियाणा निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
 
या बैठकीला भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. पण, याआधीच मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. हरियाणातील मनोहर लाल सरकारचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी कोणाला हरियाणाचे मुख्यमंत्रीपद मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
हरियाणामध्ये सध्या भाजप आणि जेजेपीचे युतीचे सरकार आहे. २०१९ मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकल्या होत्या. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४५ आकडा गाठू शकली नाही. त्यामुळे भाजपने जेजेपीच्या १० आमदारांचे समर्थन घेऊन सरकार स्थापन केले होते. आता जेजेपी आणि भाजपचे आघाडी तुटल्याचे बोलले जात आहे. मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला असला तरी, हरियाणामध्ये भाजपचे पुन्हा नव्याने सरकार स्थापन होईल. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0