संदेशखालीतील महिला खरंच पीडित आहेत, हे कसं मान्य करायचं, तृणमूलच्या महिला उमेदवाराचा प्रश्न

11 Mar 2024 20:21:12
tmc-candidate-rachna-banerjee- sandeshkhali


नवी दिल्ली :   'संदेशखालीतील महिला खरंच पीडित आहेत, हे कसं मान्य करायचं, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा उमेदवार असणाऱ्या रचना बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, प्रत्येकजण या घटनेला लैंगिक छळ असे म्हणत नाही आहे. तसेच, आम्हाला कसे कळेल की जे लोक पीडित असल्याचा दावा करत आहेत तेच खरे बळी आहेत, असेही रचना बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, रचना बॅनर्जी यांनी संदेशखाली प्रकरणाबाबतचे वक्तव्य हे लज्जास्पद असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. संदेशखाली प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे असून याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी येथील विरोधी पक्षीयांनी केली आहे. शेख शहानजान या गुंडाने संदेशखाली भागात दहशत पसरवली असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितली होती.


हे वाचलंत का? >>> ममतादीदींचा 'इंडिया' आघाडीला दणका! बंगालमध्ये उमेदवार जाहीर


त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या हुगळी लोकसभा मतदारसंघातून टीएमसीच्या उमेदवार म्हणून रचना बॅनर्जी यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ज्या महिला स्वत:ला पीडित म्हणवत आहेत, त्या प्रत्यक्षात पीडित आहेत हे कसे कळणार? रचना बॅनर्जी यांनी दि. ११ मार्च रोजी संदेशखाली येथील पीडित महिलांवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, जे या घटनेबद्दल कॅमेऱ्यात बोलत आहेत ते प्रत्यक्षात पीडित नाहीत, असा कांगावा करण्यात आला आहे.

संदेशखाली येथील हिंसाचार, जमीन बळकावणे आणि महिलांचा छळ यात टीएमसी नेत्यांचा सहभाग असल्याचेही टीएमसी उमेदवार रचना बॅनर्जी यांनी नाकारले. ते म्हणाले, "प्रथम साक्षीदारांचे म्हणणे पडताळून पाहावे लागेल आणि अशा घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत का, हे शोधून काढावे लागेल. त्या पुढे म्हणाल्या, अशा घटना घडल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी आमच्याकडे ममता बॅनर्जी आहेत. असे सांगतानाच त्यांनी या घटनांना किरकोळ घटना म्हणून फेटाळून लावले आहेत.





Powered By Sangraha 9.0