विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांविरोधात थोपडले दंड! बारामतीत लोकसभा लढवणार

11 Mar 2024 18:26:14

Pawar & Shivtare


मुंबई :
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांविरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी बारामतीतून लोकसभा निवडणून लढवणार असल्याचे म्हटले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणत्याही कुटुंबाचा सातबारा नाही असे म्हणत त्यांनी दोन्ही पवारांवर टीका केली.
 
विजय शिवतारे म्हणाले की, "अजित पवारांनी पुरंदरच्या स्वाभीमानी जनतेचा अपमान केला आहे. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. बारामतीमध्ये ६ लाख ८६ हजार मतदान पवारांना आहे, तर ५ लाख ८० हजार मतदान पवार विरोधकांचं आहे. ६ लाख ८६ हजारांमध्ये दोन भाग होतील आणि तर ५ लाख ८० हजारांमध्ये एकटा विजय शिवतारे असेल घाबरू नका," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - बाळासाहेबांचा झंझावात ज्या शिवतीर्थावर गर्जायचा तिथे होणार राहुल गांधींची सभा! उद्धव ठाकरेही होणार सहभागी
 
"बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ आहे. तो कोणत्याही एका कुटुंबाचा सातबारा नाही. त्यामुळे आजपर्यंत लोकांना फक्त पवार विरुद्ध पवार असं चित्र दाखवलं जातं. पण तसं काहीही नाही. पवारांच्या विरोधात मतदार करणारे अनेक लोक या मतदारसंघात आहेत. त्यांनी कुठे मतदान करायचं?," असा सवाल त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "सुप्रीया सुळेंनी १५ वर्ष काहीही काम केलेलं नाही. संसदेत भाषणं करुन विकास होत नाही. लोकसभेच्या खासदार म्हणून त्यांनी जे मोठे प्रकल्प आणायला हवे होते ते वेगवेगळ्या भागात आणायला हवे होते. पण सगळे प्रकल्प बारामतीमध्ये आणले. त्यामुळे तुम्ही फक्त बारामतीचेच खासदार आहात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे."
हे वाचलंत का? -  वसुलीबाजांचा बुरखा फडणवीसांनी टराटरा फाडला!
 
"भाजप आणि शिवसेनेत आलेले कित्येक लोक म्हणतात की, आम्ही यांच्या जाचाला कंटाळून इकडे आलो आहोत. त्यामुळे भाजप आज आम्हाला त्यांनाच मतदान करायला सांगत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. त्यामुळे बारामतीत दोन पवारांची लढाई असली तरी या लढाईत विजय शिवतारे उतरणार म्हणजे उतरणार. मी आमच्या नेत्यांच्या विरोधात नाही तर आमचा विरोध पवारांना आहे," असेही ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0