बाळासाहेबांचा झंझावात ज्या शिवतीर्थावर गर्जायचा तिथे होणार राहुल गांधींची सभा! उद्धव ठाकरेही होणार सहभागी

11 Mar 2024 16:42:24

Rahul Gandhi


मुंबई :
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने दुमदुमणाऱ्या शिवाजी पार्कवर आता राहूल गांधींची सभा होणार आहे. उद्धव ठाकरेदेखील या सभेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
येत्या १२ मार्च रोजी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. १२ ते १६ मार्चपर्यंत धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक, भिवंडी असा प्रवास करत ही यात्रा ठाण्यात दाखल होईल. १६ तारखेला ठाण्यात चैत्यभुमीवर या रॅलीचा समारोप होईल.
हे वाचलंत का? - राज्य सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
 
त्यानंतर १७ तारखेला शिवाजी पार्कवर राहूल गांधींची मोठी सभा होणार आहे. या सभेकरिता उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले आहे. सोमवारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले. दरम्यान, ठाकरेंनी हे निमंत्रण स्विकारले असून तेसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
Powered By Sangraha 9.0