Oscar 2024 : ओपनहायमरचा ७ ऑस्कर पुरस्कारांवर शिक्का; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

11 Mar 2024 11:51:04
'आर्यनमॅन' रॉबर्ट डाउनीला मिळाला ओपनहायमर चित्रपटामुळे कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार
 

oscar 2024 
 
मुंबई : जगभरातील कलाविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी ‘ऑस्कर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार आहे. ९६व्या अकादमी पुरस्कार २०२४ चे वितरण लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ११ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता सुरु झाले. यंदाच्या ऑस्करवर ‘ओपनहयमर’ (Oppenheimer) चित्रपटाने शिक्कामोर्तब केला असून तब्बल (Oppenheimer) ७ पुरस्कारांवर नाव कोरण्याचा इतिहास त्यांनी रचला आहे. पाहूयात ऑस्करवर यंदा कोणी आपले नाव कोरले आहे याची यादी...
 
ऑस्कर २०२४ : विजेत्यांची यादी
 
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- ओपनहाइमर
 
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- एम्मा स्टोन (पुअर थिंग्स)
 
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- किलियन मर्फी (ओपनहाइमर)
 
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- क्रिस्टोफर नोलन (ओपेनहाइमर)
 
-सर्वोत्कृष्ट मूळ गाणं- व्हाट वाज आई मेड फॉर (बार्बी)
 
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रॉबर्ट डाउनी जूनियर (ओपनहाइमर)
 
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
 
 
 
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर- लुडविग गोरानसन(ओपनहाइमर)
 
- सर्वोत्कृष्ट साउंड- द जोन ऑफ इंटरेस्ट
 
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म- द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर
 
- सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- ओपनहाइमर
 
हे वाचलंत का? - नितीन देसाई यांना ऑस्कर सोहळ्यात जगातील कलाकारांनी दिली मानवंदना  
 
- सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म- 20 डेज इन मारियुपोल
 
-सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म- द लास्ट रिपेयर शॉप
 
- सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- ओपनहाइमर
 
 
 
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- गॉडजिला माइनस वन
 
- सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म- द जोन ऑफ इंटरेस्ट
 
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा- पुअर थिंग्स
 
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स
 
- सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल- पुअर थिंग्स
 
- सर्वोत्कृष्ट एडेप्टेड स्क्रिनप्ले- अमेरिकन फिक्शन
 
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्ले- एनाटॉमी ऑफ ए फॉल
 
- सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फिचर फिल्म- द बॉय एंड द हेरॉन 
 
- सर्वोत्कृष्ट एनिमेटेड शॉर्ट मूव्ही- वॉर इस ओवर! इंस्पायर्ड बाई द म्यूजिक ऑफ जॉन एंड योको
 
दरम्यान, जगभरात अॅव्हेंजरर्स सीरीजचे सगळेच चाहते आहेत. या सीरिजमधील आर्यनमॅन अर्थात अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर (Robert Downey Jr) याला त्याच्या कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्याला 'ओपनहायमर' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असून रॉबर्ट डाउनीला यापुर्वी तीन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी केवळ नामांकनच मिळाले होते.
Powered By Sangraha 9.0