मोठी बातमी! जीएसटी अंतर्गत नवीन ५२२ पदांना मान्यता!
11 Mar 2024 16:38:18
मुंबई : राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयात जीएसटी मधील नवीन पदांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात जीएसटीमधील नव्या पदांना मान्यता देण्याबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रदेखील उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेताना मातृत्वाचा सन्मान केला आहे. मातृत्वासंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत आपल्या नावात अधिकृतरित्या आईच्या नावाचा उल्लेख करत राज्यप्रमुखांनी या निर्णयाच्या अमलबजावणीस सुरूवात केली आहे.
राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा आ. आदिती तटकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंत्री तटकरे म्हणाल्या, महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी सांभाळताना घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होताना पाहून अत्यंत आनंद होत असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
अयोध्येत बांधकामाकरिता भूखंड मंजूर
जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पाबरोबरच अयोध्येत महाराष्ट्र अतिथीगृहाच्या बांधकामासाठी भूखंड मंजूर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अयोध्येतील बांधकामासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येणार आहे.