'हा' खेळाडू बनू शकतो चेन्नईचा कर्णधार!

11 Mar 2024 17:12:39
Chennai Super Kings IPL



मुंबई :   आयपीएलचा यंदाचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. त्यातच सर्वच संघाकडून रणनीती आखण्यास सुरूवात झाली आहे. सध्या महिला आयपीएल खेळविण्यात येत असून येत्या रविवारी म्हणजेच दि. १७ मार्च रोजी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. दरम्यान, आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू राहिलेला अंबाती रायडू यांच्या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

आयपीएलच्या पुढील हंगामात रोहित शर्माने चेन्नईसाठी खेळावे. तसेच, एम एस धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा चेन्नईचं कर्णधारपदी सांभाळू शकतो, असेही अंबाती रायडू याने म्हटले आहे. त्याचबरोबर, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटविल्यानंतर क्रिकेट जाणकारांकडून नाराजीचा सूर उमटला होता. त्यातच आता रायडूनेदेखील यावर भाष्य केले आहे.


हे वाचलंत का? >>>  कॅबिनेट मंत्री लोढा यांची लतादीदींना अनोखी मानवंदना!


रायडू म्हणाला, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटविण्यात मुंबई इंडियन्स संघाने घाई केल्याचेही त्याने सांगितले. तसेच, हार्दिक पांड्याला पुढील हंगामात मुंबई इंडियन्सने कर्णधारपदी नियुक्त केले पाहिजे होते, असेही त्याने म्हटले आहे. परंतु, यंदाच्या मोसमात रोहित शर्माच संघाचा कर्णधार हवा होता, पण मुंबई इंडियन्सने घाई केल्याचे रायडूने म्हटले आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा पुढील तीन ते चार वर्ष आयपीएल खेळताना दिसू शकतो. त्यामुळे पुढील हंगामात चेन्नईचे कर्णधारपद त्यास मिळू शकते. त्याचबरोबर, जर का धोनीने निवृत्ती जाहीर केली तर पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रिक्त असेल. त्यामुळे या रिक्तपदी कोणाची नेमणूक होईल, याबाबत क्रिकेटरसिकांत चर्चा होताना दिसत आहेत. त्यातच मला रोहित शर्माला चेन्नईकडून खेळतान पाहायचं आहे या अंबाती रायुडूच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या १७ व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेत रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला सारले. तसेच, मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा चषक मिळवून देणाऱ्या रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्यानंतरच रोहित शर्माबद्दल चर्चेला उधाण आले. रोहित शर्मबद्दल अंबाती रायडू यानं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या. रोहित शर्मानं चेन्नईचं कर्णधारपद संभाळावं, असे रायडूने म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0