भांडूपमध्ये जगातील सर्वात जास्त क्षमतेचा पाणी प्रकिया प्रकल्प

01 Mar 2024 14:15:36

Welspun
 
मुंबई: वेलस्पून एंटरप्राईज ४१२४ कोटी रुपयांचा पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महाराष्ट्रात उभा करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मुंबईतील भांडूप येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.' डिझाईन, बिल्ड, ऑपरेशन मेंटेनन्स' या प्रणालीवर हा प्रकल्प असेल. या प्रकल्पाची एकूण किंमत ४१२३.८८ कोटी रुपये,ऑपरेशन मेंटेनन्स'साठी १८८०.४४ कोटी रुपये असणार आहे.
 
डिझाईन बिल्ड प्रकल्प हा पुढील ४८ महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगातील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी असणारा सर्वात जास्त क्षमतेचा म्हणून हा प्रकल्प असणार आहे.
 
WEL ने आगामी प्लांटसाठी तंत्रज्ञान पुरवठादार म्हणून जल क्षेत्रातील तज्ञ असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीपैकी एक Veolia सोबत भागीदारी केली आहे. संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या आणि टिकाऊ पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेनुसार, प्रगत उपचार प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे WEL चे उद्दिष्ट आहे.
Powered By Sangraha 9.0