"मीच लोकांना..." ममतांचा गुंड शेख शाहजहानने दिली गुन्ह्याची कबुली

01 Mar 2024 13:11:59
 Sandeshkhali
 
कोलकाता : पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचा नेता आणि संदेशाखालीमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा आरोपी शाहजहान शेखने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या विरोधात जमाव भडकवून त्यांच्याविरोधात हिंसा घडवून आणली होती, अशी कबुली त्याने दिली आहे.
 
संदेशखळी येथील महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या शाहजहान शेखच्या प्रकरणाबाबत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला लोकांची नाराजी सहन करावी लागत आहे. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) शाहजहान शेख यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. यासह त्याच्या प्रकरणाचा तपास बंगाल पोलिसांच्या सीआयडी शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
 
 हे वाचलंत का? - JNU विद्यापीठात डाव्यांची मुजोरी! ABVP च्या कार्यकर्त्यांना मारहाण
 
दोन महिन्यानंतर अटक झाल्यानंतर शहाजहानने तपास अधिकाऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याचे म्हटले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्यात आपला हात असल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलिसांना रिमांड मागण्यासाठी न्यायालयाला सांगितले की, शहाजहान शेखशी संबंधित मुद्द्यांसह संदेशखळी आणि नझात पोलिस स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे.शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांच्या सुटकेमुळे या भागात आणखी हिंसाचार होऊ शकतो.
 
 हे वाचलंत का? - काँग्रेस नेत्याने पत्रकाराला केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल!
 
पोलिसांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडताना म्हटले आहे की, आरोपीची प्रतिष्ठा खूप खराब आहे आणि कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून तो फरार होण्याची शक्यता आहे. बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखचा आणखी एक जवळचा सहकारी अमीर अली गाझी यालाही अटक केली आहे. त्याला ओडिशातील राउरकेला येथून अटक करण्यात आली आहे. संदेशखळी येथील ग्रामस्थांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप अमीर अलीवर गेल्या काही दिवसांत करण्यात आला होता. तो महिलांना धमकावून मनरेगा कामगारांकडून पैसे वसूल करायचा.
 
शाहजहान शेख याला बंगाल पोलिसांनी गुरुवारी, दि. २९ फेब्रुवारी २०२४ सकाळी उत्तर २४ परगणा येथील मीनाखान परिसरातून अटक केली होती. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, भाजपने आरोप केला आहे की केंद्रीय एजन्सींच्या अटकेपासून वाचवण्यासाठी बंगाल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला सर्व प्रकारची सोई दिल्या जात आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0