हिंदूराष्ट्राबाबत बागेश्वर बाबांचे मोठे विधान!

    09-Feb-2024
Total Views |

Dhirendrakrushna Shastri
(Bageshwar Baba on Hindurashtra)

पुणे :
"छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केला होता. आज त्याच महाराष्ट्रातून मी सांगतो भारत हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जाईल."; असे प्रतिपादन धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी आळंदी येथे सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवामध्ये ते बोलत होते. दरम्यान पवित्र अशा आळंदी तीर्थस्थानी अध्यात्मिक वातावरणाने आपला दिवस विलक्षण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, "भारताचा अमृत महोत्सव साजरा होताना पाहिला, श्रीरामललास मंदिरात विराजमान होताना पाहिले; आज महाराष्ट्राच्या धरतीवर संतांच्या ध्वजाला फडकवणाऱ्या, महाराष्ट्रात सनातन संकृतीची चेतना जागवणाऱ्या गोविंददेव गिरीजी महाराजांचा अमृत महोत्सव होताना आपण पाहतोय, हे आपलं सौभाग्य आहे."

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.