आझम खान यांच्यावर आरोप निश्चित! दोन मुलांसह, पत्नीलाही तुरुंगात जावं लागणार?

    09-Feb-2024
Total Views |
 Azam Khan
 
लखनौ : समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या आझम खान यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. शत्रू संपत्ती बेकायदेशीरपणे हस्तगत करून जौहर विद्यापीठात समाविष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने आझम खान यांच्यासह १४ जणांवर आरोप निश्चित केले आहेत.
 
न्यायालयात आरोपांचे वाचन करण्यात आले. यावेळी आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा माजी आमदार अब्दुल्ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाले, तर उर्वरित आरोपी स्वत: कोर्टात पोहोचले. आझम खानवर याआधी सुद्धा विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापैकी अजीमनगर पोलिस ठाण्यात शत्रू संपत्ती हस्तगत करून ती जौहर विद्यापीठात विलीन केल्याचा या प्रकरणांमध्ये आरोप आहे.
 
आझम खान हे जौहर ट्रस्टचे अध्यक्षही आहेत. पोलिसांनी तपास पूर्ण करून ट्रस्टच्या इतर अधिकाऱ्यांसह १५ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आझम खान व्यतिरिक्त आरोपींमध्ये त्यांचा मोठा मुलगा अदीब आझम, अब्दुल्ला, त्यांची पत्नी ताजीन फातमा, चमरौआचे आमदार नसीर अहमद खान, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सलीम कासिम यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी सलीम कासिमचा मृत्यू झाला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.