अदानी गॅस व इंडियन ऑईलचे नवीन मिशन ' इतके ' कोटी गुंतवणार

गॅस पुरवठ्याची क्षमता दुप्पटीने वाढवण्यासाठी दोन्ही गॅस कंपन्या करणार भरघोस गुंतवणूक

    09-Feb-2024
Total Views |

iol 
 
 
अदानी गॅस व इंडियन ऑईलचे नवीन मिशन, ' इतके ' कोटी गुंतवणार
 

गॅस पुरवठ्याची क्षमता दुप्पटीने वाढवण्यासाठी दोन्ही गॅस कंपन्या करणार भरघोस गुंतवणूक
 

मुंबई: मिडिया रिपोर्टनुसार गॅस उत्पादनवाढीसाठी इंडियन ऑईल व अदानी गॅस संयुक्तरित्या सुमारे २५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहेत. तब्बल ३०१.२४ दशलक्ष रूपयांची गुंतवणूक करून तसेच घरगुती गॅस व व्यावसायिक उद्योगधंद्यांना गॅसचा पुरवठा वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय या दोन्ही कंपन्यांनी घेतला असल्याचे सांगितले जात आहे. रिफायनर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन व अदानी टोटल गॅस एकत्रितपणे गॅसचे प्रमाण एक दशलक्ष क्युबिक मीटरने वाढवून ३०० रिटेल आउटलेट मार्फत गॅस पुरवणार असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख एस के झा यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले आहे.
 
भविष्यात गॅसची वाढती मागणी लक्षात घेता अनुरूप उत्पादन वाढवण्यासाठी हा निर्णय घेऊन भविष्यात आणखी ६०० रिटेल आउटलेट उघडण्याचा आमचा संकल्प असल्याचे झा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
 
भविष्यात दीर्घकालीन गॅसचा मागणी पुरवठ्याच्या विचार करताना अत्यावश्यक सेवांना आवश्यक गॅसचे उत्पादन वाढवणे हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.