"ज्ञानवापी वाचवा" - कट्टरपंथीयांची कोर्टाच्या निर्णयाविरोधात पोस्टरबाजी

    08-Feb-2024
Total Views |
gyanvapi
लखनौ : वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात हिंदू पक्षाला पूजेचा अधिकार दिला होता. त्यानंतर व्यास तळघरात पूजा देखील सुरु झाली आहे. यासोबतच काही कट्टरपंथी दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशातील पिलीभीत शहराजवळील चिडियादाह गावात ज्ञानवापी मशिदीच्या समर्थनार्थ घरांच्या भिंतींवर पोस्टर चिकटवण्यात आले होते.
 
आक्षेपार्ह पोस्टर चिटकवण्यात आल्याची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत पोलिसांनी ती पोस्टर काढून घेतली. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी गावातील लोकांची चौकशी केली, मात्र ही पोस्टर्स कोणी लावली हे अद्याप कळू शकले नाही. गावात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर इंग्रजीत ठळक अक्षरात ज्ञानवापी वाचवा असे लिहिले आहे. त्यानंतर त्याच्या खाली हिंदीत लिहिले होते की, न्यायालयाच्या एकतर्फी निर्णयाला आमचा विरोध आहे."
 
पोलिसांनी भिंतींवरील पोस्टर्स हटवण्याचे काम सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी गावभर फिरून तेथील लोकांकडून या पोस्टर्सबाबत चौकशी केली. मात्र, ही पोस्टर्स कोणी आणि कधी लावली, हे कोणीच सांगितले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.