"ठाकरे-पवारानंतर राऊतांचं पुढचं टार्गेट काँग्रेस"

भाजप आमदार नितेश राणेंचा घणाघात

    08-Feb-2024
Total Views |

Raut


मुंबई :
ठाकरे आणि पवार कुटुंबात आग लावल्यानंतर आता राऊतांचं पुढचं टार्गेट काँग्रेस आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. त्यामुळे त्यांना आता संजय राजाराम राऊत म्हणायचं की, संजय राजाराम गांधी हा प्रश्न निर्माण झाल्याचेही ते म्हणाले आहेत. गुरुवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "गांधी कुटुंबाची आणि नेहरुंविषयी जेवढा एखादा काँग्रेसचा कार्यकर्ता बोलत नाही तेवढं संजय राजाराम राऊत बोलले आहेत. मी किती मोठा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, हे त्यांनी दाखवलं आहे. उद्धव ठाकरे आणि पवार कुटुंबामध्ये आग लावल्यानंतर आता माझं पुढचं टार्गेट हे काँग्रेस आहे, हे संजय राऊतांनी सकाळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्यांना संजय राजाराम राऊत म्हणायचं की, संजय राजाराम गांधी म्हणायचं हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊतांच्या घरात आणि त्यांच्या मालकाच्या घरात किती गुंड राहतात, याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटरवर टाकावी. यात त्यांनी आदित्य ठाकरेंचादेखील फोटो टाकावा," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "राहुल गांधींना आता स्वत:च्या गांधी नावाच्या आरक्षणाची चिंता लागली आहे. म्हणूनच ते कधी जातीबद्दल तर कधी आरक्षणाबद्दल बोलतात. देशात मुळ विकासाच्या मुद्यावर निवडणुक कशी होणार नाही यासाठी राहूल गांधींसारखे लोकं प्रयत्न करतात," असेही ते म्हणाले.
 
बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसच्या नफरतच्या दुकानात आता मुळ काँग्रेस नेत्यांनादेखील राहायचं नाही. त्यामुळे काँग्रेसचे नफरतचे दुकान हे बंद होण्याच्या मार्गावर असल्याने बाबा सिद्दीकीसारखा अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्ता लवकरच योग्य निर्णय घेईल यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो," असेही ते म्हणाले.
तसेच उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे अभिनंदन केले. याशिवाय महाराष्ट्रातही लवकरात लवकर हा कायदा लागू करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. येणाऱ्या अधिवेशनात समान नागरी कायदा आणावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.