काहीही झालं तरी मंडल आयोगाला चॅलेंज करणारच : मनोज जरांगे

    08-Feb-2024
Total Views |

Manoj Jarange


नाशिक :
मराठा आरक्षणात जर पडद्यामागून कुणी नाटकं केलीत तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. मनोज जरांगे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणावरून सध्या मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान, आता मनोज जरांगेंनी मंडल आयोगाला चॅलेंज करण्याचा इशारा दिला आहे.
 
मनोज जरांगे छगन भुजबळांना उद्देशून म्हणाले की, "तुमच्यासारखे आम्ही गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं करणारे नाहीत. तुम्ही तीनदा आमचं आरक्षण मिळवून दिलं नाही. आता जर तुम्ही पडद्यामागून नाटकं केली आणि या आरक्षणात जर तुम्ही काही प्रकार केला तर, मग मात्र मंडल आयोगाला चॅलेंज केल्याशिवाय गप्प बसणार नाही," असे ते म्हणाले.
 
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी मंत्री छगन भुजबळांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने लवकरात लवकर सगे-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा, येत्या १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.