प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्के वाढ

‘हाऊसिंग डॉटकॉम’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

    08-Feb-2024
Total Views |
Housing.com news


मुंबई
: सन 2019 पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्या भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, 2019च्या महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत प्रमुख आठ शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्ये 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्पन्नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्मक ट्रेण्ड्स असतानादेखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक ‘रिअल इस्टेट हब्स’च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी ‘हाऊसिंग डॉटकॉम’च्या अहवालामधून निदर्शनास आल्या आहेत.
 
देशातील आघाडीचे ‘रिअल इस्टेट टेक’ व्यासपीठ ‘हाऊसिंग डॉटकॉम’चा नवीन अहवाल ‘रेसिडेन्शियल रेण्ट्स ऑन द राइज! ए रिपोर्ट ऑन रेण्टल प्रॉपर्टी इन इंडिया’ या नावाने नुकताच प्रसिद्ध झाला. मासिक सरासरी भाडेदरामधील वाढ भांडवल मूल्यांमधील वाढीपेक्षा उच्च आहे.प्रमुख शहरांमधील मालमत्ता किमतींमध्ये 2019च्या महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली, तर सरासरी मासिक भाडेदरांमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच, सेवा क्षेत्रातील अग्रणी शहरांमधील विशिष्ट प्रमुख ठिकाणी याच कालावधीदरम्यान भाडेदरांमध्ये 30 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली.
 
‘हाऊसिंग डॉटकॉम आयआरआयएस इंडेक्स’मधून निदर्शनास आले की, महामारीनंतरच्या काळात मध्यम भाडेदरासह घर भाड्याने देण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. हे ‘इंडेक्स’ ऑनलाईन सर्चवर लक्ष देत आगामी मागणीबाबत माहिती देते. या ‘इंडेक्स’मधून निदर्शनास येते की, महामारीनंतरच्या काळात ऑनलाईन रेण्टल सर्च क्रियाकलापांमध्ये गृहखरेदीच्या तुलनेतवाढ झाली आहे. सध्या भाडेदरासाठी ‘आयआरआयएस इंडेक्स’ 23 पॉइण्ट्सवर आहे. जो घर खरेदी करण्याबाबतच्या इंडेक्सच्या तुलनेत उच्च आहे.

‘हाऊसिंग डॉटकॉम’, ‘प्रॉपटायगर डॉटकॉम’ आणि ‘मकान डॉटकॉम’चे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल याबाबत बोलताना म्हणाले की, “महामारीनंतर गृहखरेदी व घर भाड्याने देण्यासंदर्भातील मागणीमध्ये वाढ झाली आहे. गृहनिर्माण बाजारपेठेतील किमतीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे.”‘हाऊसिंग डॉटकॉम’ येथील संशोधन प्रमुख अंकिता सूद याविषयी म्हणाल्या की, “उच्च व्याजदर आणि संपादन खर्च यांसारख्या कारणांमुळे भारतातील भाडे परतावा ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. पण, मालमत्तेच्या वाढत्या किमती, संभाव्य खरेदीदारांसाठी परवडण्याच्या बाबतीतील आव्हाने आणि तयार सदनिकांबाबत यादीचा मर्यादित पुरवठा यासह महामारीनंतर घर भाड्याने देण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरूग्राम, बंगळुरु, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या सेवा क्षेत्रातील महत्त्वाच्या शहरांच्या ‘सीबीडी’मध्ये 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.”

सूद पुढे म्हणाल्या की, “अधिक पुढे जात, पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये बाजारपेठेत नवीन तयार सदनिकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असणार आहे. ज्यामुळे आम्हालाघर भाड्याने देण्याच्या मागणीमधील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे. या शाश्वत वाढीमुळे मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्ये रूची निर्माण झाली आहे. ज्यामधून रेण्टल बाजारपेठेत उदयोन्मुख संधी दिसून येत आहेत.‘हाऊसिंग डॉटकॉम रिसर्च’ने देखील भारतातीलप्रमुख गृहनिर्माण बाजारपेठेतील भाडे परताव्यांची प्रमुख जागतिक शहरांमधील भाडे परताव्यांसोबत तुलना करण्यासाठी किंमत ते भाडे गुणोत्तरचे गणन केले आहे. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामधील मध्यम मालमत्ता मूल्याला मध्यम वार्षिक भाडेदराने भागाकार करत किंमत ते भाडे गुणोत्तर निर्धारित केले जाते.कमी किंमत ते भाडे गुणोत्तर म्हणजे मालमत्ता मालकांसाठी उच्च भाडे उत्पन्न किंवा गुंतवणुकीवर उच्च परतावा. हे गुणोत्तरमालमत्ता खरेदी करण्याच्या तुलनेतभाड्याने देण्यासंदर्भातील स्पर्धात्मक किफायतशीरपणाचे मूल्यांकन करण्यामध्ये मदत करते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.