मुंबईत सहकार भारतीचे हाउसिंग सोसायटी राष्ट्रीय महाअधिवेशन

    08-Feb-2024
Total Views |
Housing Society National Convention news

मुंबई
: सहकार क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या 'सहकार भारती'तर्फे मुंबईत 'हाउसिंग सोसायटी राष्ट्रीय महाअधिवेशन' आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीत फाईन आर्टस् कल्चरल सोसायटी, चेंबूर येथे एकदिवसीय अधिवेशन होणार आहे. सहकार भारतीने आपल्या भौगोलिक विस्तारासह यावर्षी निरनिराळ्या सेलमध्ये (प्रकोष्ठ) कार्य करण्याची योजना तयार केली आहे. २०२३-२४ या कालावधीत १२ हून अधिक सेलमध्ये राष्ट्रीय स्तरावर सहकारी बँक, क्रेडिट सोसायटी, पॅकस, स्वयंसहाय्यता समुह यांच्याशी निगडित अधिवेशन / सम्मेलन आयोजित करण्याचा निर्णय सहकार भारतीने घेतला आहे.

सध्या आपल्या देशातील गृहनिर्माण संस्थांनी देशाच्या विकासासाठी मोठे कार्य करूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्याचे निराकरण राज्यांसह केंद्र सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकते. गृहनिर्माण संस्थांच्या समस्या संघटितपणे राज्ये आणि केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी सहकार भारतीने १९ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय गृहनिर्माण संस्थांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिवेशनात भारतभरातून २००० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय राज्यमंत्री बी.एल.वर्मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या सर्व मान्यवरांना संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अधिवेशनात गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.