सोरेन यांची बीएमडब्लू धीरज साहूंची! ईडीने साहू-सोरेन संबंधांचा केला पर्दाफाश

    08-Feb-2024
Total Views |
 dhiraj sahu
 
रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कोठडीत आहेत. तपास यंत्रणेने त्याची एक बीएमडब्ल्यू कारही जप्त केली होती. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि दारू व्यावसायिक धीरज साहू यांनी ही आलिशान कार खरेदी करून त्यांना दिल्याचे आता समोर आले आहे.
 
काही दिवसांपूर्वीच आयकर (आयटी) विभागाने धीरज साहूच्या घरातून ३९० कोटी रुपये जप्त केले होते. ईडीने गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून साहू-सोरेन लिंकचा पर्दाफाश केला. ईडीने जप्त केलेली बीएमडब्ल्यू कार एका खाजगी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे आढळून आले, कंपनीची तपासणी केली असता ती हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
 
सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याआधी २ बीएमडब्ल्यू कार जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच ३६ लाख रुपये आणि काही कागदपत्रेही सापडली आहेत. हेमंत सोरेन हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. सध्या हेमंत सोरेन हे पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.