ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या

    08-Feb-2024
Total Views |
Abhishek Ghosalkar Shot in Mumbai

मुंबई
: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा असे आरोपीचे नाव असून, त्यानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयाला गुरुवारी भेट दिली. या भेटीदरम्यान मॉरिस याने फेसबुक लाईव्ह करीत त्यांना बोलण्याचे आवाहन केले. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिसने अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. पैकी तीन गोळ्या लागल्याने त्यांना बोरिवली येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, मॉरिस नरोन्हाने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवरही ४ गोळ्या झाडत आत्महत्या केली. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'मॉरिसभाई' या नावाने ही व्यक्ती बोरिवली आणि दहिसर परिसरात ओळखली जायची. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.