पोलीस ठाण्याबाहेर होती मोहल्ल्यातील झुंड! सर तनसे जुदाचे नारे! SHO आनंद सिंह ठाकुर बनले सिंघम

    07-Feb-2024
Total Views |
small-fight-between-hindu-youth-and-a-muslim-tailo

नवी दिल्ली :
  मध्य प्रदेशातील दमोहमध्ये कट्टरतावादी मुस्लिमांच्या जमावाने चार हिंदू तरुणांचे हात, पाय आणि डोकी कापण्याची धमकी दिली. सदर धमकी मुस्लिमांचा जमाव जमवून देण्यात आली. याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांशीही गैरवर्तन करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यासंदर्भातला एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये शेकडो कट्टरवाद्यांच्या जमावामध्ये पोलीस इन्स्पेक्टर आनंद सिंह ठाकूर निर्भयपणे जमावाला इशारा देताना दिसत आहेत. एसएचओ आनंदर सिंह ठाकूर एकटेच लढतानाचे दृश्य व्हिडीओतून दिसत असून सोशल मीडियावर याप्रकरणानंतर एसएचओ ठाकूर यांना रियल सिंघम म्हटले जात आहे.

एकंदरीत, जेव्हा उन्मादात असलेला मुस्लिम जमाव दमोह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचताच आरडाओरड करत हात पाय कापण्याची धमकी देत असताना एसएचओ आनंदसिंग ठाकूर एकट्याने उन्मादी जमावामध्ये प्रवेश करताना व्हिडीओत दिसत आहे. ते म्हतायत की, "मी एकटाच आलो आहे. मी एकटाच उभा आहे, कृपया मला मदत करा. आम्ही कारवाई करू असे म्हणत असताना तुमचे हात कापण्यात काय अर्थ आहे."

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.