मोहम्मदचे गुलाम आयेंगे, मस्जिद शुद्ध होईल! अजान पुन्हा गुंजेल : मौलाना मुफ्ती सलमान अझरी; दुसरी FIR दाखल

    07-Feb-2024
Total Views |
second-fir-against-maulana-mufti-salman-azhari

नवी दिल्ली :
कच्छमध्ये मौलाना मुफ्ती सलमान अझरी विरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कच्छमधील ज्या व्हिडिओसाठी दुसरा एफआयआर दाखल झाला आहे, त्या व्हिडिओमध्ये सलमान अझरी असे म्हणताना दिसतोय की, “आमचा विश्वास आहे की जर त्यांनी मशिदीची विटंबना केली, तर पैगंबर मोहम्मदचा एक 'गुलाम' येईल जो मशीद शुद्ध करेल आणि अजान मशिदीत गुंजेल. तसेच, तो पुढे म्हणतोय की, आज या कुत्र्यांचा दिवस आहे, उद्या आमचा असेल".
 
दरम्यान, सदर व्हिडीओच्या माध्यमातून मौलाना मुफ्ती सलमान अझरी हा "नारा-ए-तकबीर, अल्लाह हू अकबर" चा नाराही देताना दिसून येत आहे. दि. ०६ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील कच्छमध्ये मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांच्या विरोधात दुसरी एफआयआर नोंदवण्यात आल्याचे समोर आले. त्याआधी दि. ३१ जानेवारी रोजी प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी सलमान अझरीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुजरातमधील जुनागढमध्ये आधीच एफआयआरचा सामना करावा लागत आहे. गुजरात एटीएसने त्याला महाराष्ट्रातून उचलले. जुनागढला जाण्यापूर्वी त्यांनी कच्छमध्ये असेच भाषण दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.