ब्रेकिंग न्यूज; शरद पवार गटाला मिळालं नवं नाव

    07-Feb-2024
Total Views |
nationalist-congress-party-sharadchandra-pawar-name-given

मुंबई :
शरद पवार गटाला अखेर नवं नाव मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, दि. ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अधिकृतरित्या देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावांचे पर्याय दिले होते. त्यानुसार आता शऱद पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या नावाने आगामी निवडणूक लढविणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेले तीन नवे पर्याय पुढीलप्रमाणे :-

१. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार
२. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदराव पवार
३. राष्ट्रवादी- शरद पवार.
 
या संदर्भात, हे नमूद करणे आवश्यक आहे की सक्षम प्राधिकाऱ्याने, वरील संदर्भित त्याच्या अंतिम आदेशाच्या परिच्छेद 143 चा पाठपुरावा करून, आपल्या पहिल्या पसंतीस मान्यता दिली आहे, म्हणजे. "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार" महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी आगामी निवडणुकीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.