भरतीसंदर्भात मोठी अपडेट; 'महाट्रान्सको' भरती परीक्षा आता सुधारित वेळापत्रकानुसार, वाचा सविस्तर

    07-Feb-2024
Total Views |
mahatransco Recruitment exam Postponed

मुंबई : 
  'महाट्रान्सको' अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता व उप कार्यकारी अभियंता या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. परंतु, या पदभरतीसंदर्भात महाट्रान्सकोकडून नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या भरतीसाठी आता दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 
दरम्यान, 'महाट्रान्सको' अंतर्गत जाहिरात क्र. ०५/२०२३ आणि जाहिरात क्र. ०६/२०२३ या भरतीसाठी नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणांमुळे सदर पदभरती परीक्षा ऑनलाइन चाचणीद्वारे सुधारित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदभरतीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.