"ज्या काँग्रेसला स्वतःच्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदीच्या..." मोदींनी राज्यसभेत खर्गेंना घेरलं

    07-Feb-2024
Total Views |
PM Narendra Modi on INC in Rajyasabha

नवी दिल्ली :
"ज्या काँग्रेसला स्वतःच्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदीच्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तसेच, सबका साथ सबका विकास ही घोषणा नसून मोदींची हमी आहे", असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. यावेळी पंतप्रधान मोदीं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना उत्तर ते म्हणाले, खर्गेंनी ४०० जागा जिंकण्याचा आशीर्वाद आम्हाला दिला असून मी प्रार्थना करतो की, तुम्ही ४० जागा वाचवू शकाल, अशी मिष्किल टिप्पणी पंतप्रधान मोदींनी भाषणात केली.

दरम्यान, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, देशात निराशा पसरवण्याचे प्रयत्न सुरू असून ते ना स्वतःचे व देशाचे भले करू शकणार आहेत, असे सांगतानाच मेड इन इंडिया अंतर्गत सेमी कंडक्टर निर्मिती क्षेत्रात देश येत्या ५ वर्षांत ओळख निर्माण करेल. त्याचबरोबर, देशाला इलेक्ट्रिक मार्केटमध्ये नवीन गतीची क्षमता दिसेल. लाखो, करोडो रुपयांचे तेल आयात करून ऊर्जा निर्मिती करून आपण स्वावलंबी होऊ, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

दि. ०५ फेब्रुवारीला पंतप्रधानांनी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. एकच उत्पादन अनेकवेळा लाँच केल्यामुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याच्या मार्गावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशाबरोबरच काँग्रेसलाही घराणेशाहीचा फटका बसत असून हा विरोधी पक्ष गेली अनेक दशके सत्तेत होता, त्याचप्रमाणे विरोधकांनी अनेक दशके विरोधात बसण्याचा निर्धार केला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.