"मुस्लिम फक्त शरियाच मानणार "

समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांचे वक्तव्य

    07-Feb-2024
Total Views |
 ST HASAN
 
मुंबई : “कुरआन-ए-पाकने आम्हाला दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध असा कोणताही कायदा बनवला असेल तर मुस्लिम तो मान्य करायला तयार नाही." असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी केले आहे. हसन यांनी हे विधान उत्तराखंडच्या विधानसभेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायदा मांडल्यानंतर केले आहे. हसन यांनी समान नागरी कायद्याला विरोध केला.
 
एसटी हसन पुढे म्हणाले, “जर शरियतच्या कायद्यामुळे इतरांना काही त्रास होत नाही, तर मग त्यांना (भाजप) अडचण का आहे? किती दिवस ते हिंदू-मुस्लिम म्हणवून ध्रुवीकरण करत राहणार? आता लोक या राजकारणाला कंटाळले आहेत." एसटी हसन यांच्याबरोबरच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी समान नागरी कायद्याला विरोध केला आहे.
 
उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारने दि. ६ फेब्रुवारी २०२४ ला समान नागरी कायदा विधानसभेत सादर केला आहे. या कायद्याच्या मसुद्यानुसार, लग्न, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक, पोटगी यासंबंधीचे सर्व नियम कोणत्याही धर्माचा विचार न करता सर्वांना समान असतील. हा कायदा मंजूर झाल्यानंतर ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व यासारख्या अनिष्ट प्रथा नष्ट होतील.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.