महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील!

महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांची माहिती

    07-Feb-2024
Total Views |

Mahayuti


मुंबई :
राज्यातील मराठा समाजासह वंचित घटकांच्या प्रश्नांवर कार्य करणारी महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाली आहे. महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी बुधवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात माहिती दिली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रांती सेना ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून कार्य करेल, असे लाड यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र क्रांती सेनेच्या सहभागामुळे महायुतीला अधिक बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तसेच महायुतीतील इतर घटक पक्षांच्या सहमतीने महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत असून, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘महाविजय २०२४’ हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करतील, असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.