रबाळे येथे "गाव चलो अभियान"! गणेश नाईक यांच्या नेतृत्वात संवाद बैठक

    07-Feb-2024
Total Views |

Ganesh Naik


ठाणे : राज्यभरात सध्या भाजपकडून 'गाव चलो अभियान' राबवण्यात येत आहे. याद्वारे मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. यातच आता भाजप नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वात रबाळे येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
 

रबाळे येथील गृहनिर्माण सोसायटी मध्ये ही संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहनिर्माण सोसायटीचे सदस्य व सभासद उपस्तिथ होते. यावेळी गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या. तसेच त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांना मोदी सरकारच्या कार्यकाळातील १० वर्षांची माहिती आणि विविध योजनांची माहितीदेखील त्यांनी नागरिकांना दिली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.