लोकमान्य सेवा संघ आयोजित मॅजेस्टिक गप्पा

    06-Feb-2024
Total Views |

majestic 
 
मुंबई : लोकमान्य सेवा संघ पारले व श्री वा फाटक ग्रंथ संग्रहालय आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने मॅजेस्टिक गप्पा हा मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारीपासून रविवार दिनांक 18 फेब्रुवारी पर्यंत 10 दिवस अनेक मान्यवरांच्या मुलाखती या कार्यक्रमात होणार आहेत. रोज संध्याकाळी साडेसात वाजता सावरकर पटांगणात या मुलाखती संपन्न होतील.
 
शुक्रवारी ९ तारखेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची मुलाखत डॉ. निर्मोही फडके या घेणार आहेत. शनिवारी गणेश आचवल कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतील. रविवारी धर्म संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे यांची जाहीर आणि प्रकट मुलाखत आहे. सोमवारी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कृष्णात खोत आणि सिने समीक्षक गणेश मतकरी यांची मुलाखत स्नेहा अवसरीकर घेतील. मंगळवारी भानू काळे उद्योजक दीपक गद्रे यांच्याशी उद्योग जगतावर संवाद साधतील. बुधवारी अभिराम भडकमकर सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांची मुलाखत घेतील. गुरुवारी सुखाचा लपंडाव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात डॉ. नंदू मुलमुले आणि डॉक्टर रवीन थत्ते यांच्याशी संजीव लाटकर चर्चा करणार आहेत. शुक्रवारी सह्यागिरी ते हिमगिरी या सत्रात प्रसाद निकते आणि उमेश झिरपे उपस्थित राहणार आहेत तर मकरंद जोशी सूत्रसंचालन करणार आहेत. 17 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी नितीन आरेकर गप्पा मारणार आहेत. शेवटच्या दिवशी रविवारी सुप्रसिद्ध सरोद वादक ब्रिज नारायण यांची मुलाखत केशव परांजपे घेणार आहेत.
 
या भरगच्च कार्यक्रमाला येण्याचे आवाहन लोकमान्य सेवा संघ, पार्ले यांच्या वतीने संघ कार्यवाह डॉ. रश्मी फडणवीस आणि महेश काळे यांनी केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.