साडीवाटपाच्या कार्यक्रमाचा काँग्रेसनं घेतला धसका! म्हणाले, "साड्या वाटून..."

१ कोटी साड्या वाटल्या तर वडेट्टीवारांच्या पोटात का दुखतंय?

    06-Feb-2024
Total Views |

Vijay Wadettivar


मुंबई :
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महिलांना साडीवाटप करण्याच्या मुद्यावरून राज्य सरकारवर आरोप केला आहे. १ कोटी साडीवाटप करुन सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, साडीवाटपाच्या कार्यक्रमाचा काँग्रेसनं धसका घेतला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
 
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सरकारने आता महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे. म्हणजे आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा सुरु झाला आहे. खरंतर सरकारवर साडी नेसून आणि तोंड झाकून मिरवण्याची पाळी आली आहे. डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळे महिलांना साडी भेट देऊन मतं मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे. साडी घोटाळा आता प्रकाशात आलेला आहे," असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे १ कोटी साड्या वाटल्या तर वडेट्टीवारांच्या पोटात का दुखतंय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.