केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली अडवाणींची भेट

    06-Feb-2024
Total Views |
Union Home Minister Amit Shah met Advani

नवी दिल्ली : 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाल्याबद्दल गृहमंत्री शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 
“अडवाणी यांनी देशाचा सांस्कृतिक वारसा, राजकारण आणि प्रगतीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अडवाणी यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधानांनी त्यांच्या अथक संघर्षाचा आणि योगदानाचा गौरव करण्याचे काम केले आहे”, अशी प्रतिक्रिया शाह यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डादेखील उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.