उद्धव ठाकरेंचे मुस्लिमांबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, "मुस्लिम..."

    06-Feb-2024
Total Views |

Thackeray


मुंबई :
मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उबाठामध्ये येत असल्याचा दावा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. मंगळवारी पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोर्डे यांनी उबाठा गटात प्रवेश केला. यावेळी मातोश्रीवर कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ते बोलत होते.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, "एक वेगळं भगवं वादळ दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार आहे. काही जणांच्या मनात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी याबद्दल प्रश्न आहेत. पण पर्याय कुठे आहे? हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो. हुकुमशाही पहिले उपटून फेकून द्यायला पाहिजे. हाच हुकुमशाहीला पहिला पर्याय आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "साधारणता मी आणि तुम्ही हे अनुभवत आहोत की, मातोश्रीमध्ये असेल किंवा मी जिथे जातो तिथे असेल स्थानिक पातळीवर अनेकजण काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आहेत. पण भाजपमधील लोकं शिवसेनेत येत आहेत. तसेच मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेत येत आहेत," असा दावाही त्यांनी केला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.