"उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या तयारीत!"

नितेश राणेंचा गौप्यस्फोट

    06-Feb-2024
Total Views |

Uddhav Thackeray


मुंबई:
उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच मी भाजपबरोबर परत युती करण्यास आतूर नाही, अशी शपथ त्यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून घ्यावी, असेही राणे म्हणाले आहेत. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत आहेत.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत मोदीजींवर टीका केली. एका बाजूने तुम्ही मोदीजींवर टीका करता, भाजपवर गरळ ओकता, सामनाच्या अग्रलेखात हेमंत सोरेन कसे झुकले नाहीत असं लिहीता. तर दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने पुर्ण कोकण दौऱ्यात मोदीजींचे गुणगाण गायला सुरुवात केली आहे. मोदीजींना आम्ही शत्रु मानत नाही पण ते मला शत्रु मानतात असे ते म्हणतात. म्हणजेच उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या तयारीत आहेत."
 
"दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंचे कुठले सहकारी अमित शाहा आणि मोदीजींना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, याची फोटोसकट माहिती काही दिवसात मी पुढे आणणार आहे. उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी की, मी भाजपबरोबर परत युती करण्यास आतूर नाही. एकीकडे संजय राऊत सकाळी उठून टीका करतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली आणि भाजपचे उंबरठे झिजवत आहेत. पायावर डोकं ठेवण्यासाठी ते आतूर झाले आहेत," असा टोलाही राणेंनी लगावला आहे.
 
तसेच कोकण दौऱ्यावरुन मुंबईला परतताना उद्धव ठाकरेंनी वंदे भारतने प्रवास केला. यावरुनही राणेंनी निशाणा साधला. मोदीजींनी काय केलं याची माहिती घ्यायची असेल तर काल तुमचा मालक आणि मालकीन वंदे भारतने चिपळूनपासून मुंबईपर्यंत गेले आहेत. ही मोदीजींचीच देण आहे, असे नितेश राणे संजय राऊतांना म्हणाले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.