'दिवसा ऑटोने प्रवास,रात्री १० लाखांच्या हॉटेलमध्ये मुक्काम'; जिंदाल यांचा केजरीवालांवर आरोप!

    06-Feb-2024
Total Views |
Naveen Jindal On Arvind Kejriwal

नवी दिल्ली : नवीन जिंदाल यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. दिल्लीचे माजी भाजप नेते जिंदल यांनी सांगितले की, गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल दिवसा ऑटोमध्ये प्रवास करण्याचे नाटक करत होते, तर रात्री महाराज सुईटमध्ये ते राहत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, या सूईटचे प्रतिदिन भाडे ८-१० लाख रुपये आहे.

नवीन जिंदालने X/Twitter वर एक व्हिडिओ पोस्ट करून हा दावा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “भोळ्या लोकांसमोर सैल शर्ट घालून स्वत:ला ‘सामान्य माणूस’ आणि ‘कट्टर प्रामाणिक’ म्हणवणाऱ्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सत्य पहा. गुजरात निवडणुकीदरम्यान, लोकांसमोर ऑटोमध्ये प्रवास करणारे केजरीवाल रात्री पंचतारांकित हॉटेल्सच्या महाराजा सुईट्समध्ये मुक्काम करत असत, ज्याचे भाडे प्रतिदिन ८ ते १० लाख रुपये होते.

त्यांनी पुढे लिहिले की, “शीशमहालमध्ये राहणारे केजरीवाल दिल्लीकरांचा पैसा स्वतःच्या सुख-सुविधांवर खर्च करतात आणि जनतेशी खोटे बोलतात. माझे अरविंद केजरीवाल यांना खुले आव्हान आहे, जर ते थोडेसेही प्रामाणिक असतील तर कोणत्याही सार्वजनिक मंचावर या किंवा मला फोन करा. मी चर्चेसाठी सर्व कागदपत्रे घेऊन येईन.

नवीन जिंदाल यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, 'महाराजा सुईटमध्ये एक खाजगी स्विमिंग पूल देखील आहे आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या 'मित्रां'सोबत आंघोळ करायला आवडते. ते म्हणाले, "मी एक सामान्य माणूस आहे ज्याच्या नावाने अरविंद केजरीवाल कर गोळा करतात आणि स्वतःसाठी आणि त्यांचे वैयक्तिक सचिव वैभव कुमार यांच्यासाठी ८-१० लाख रुपये खर्च करतात." केजरीवाल यांच्या दुटप्पी चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, १० लाख रुपयांच्या खोलीत राहिलो आणि ८० रुपये देऊन बाहेर येऊन तीनचाकी गाडीत बसलो? तुम्हाला देशातील जनतेचे काय वाटते? आता तुम्हाला समजले का की तुम्ही तुमच्या घरात करोडो रुपये किमतीचे पडदे कसे लावले?”

नवीन जिंदाल म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी ४० दिवस प्रचार केला आणि त्यादरम्यान हॉटेल्समध्ये मुक्काम केला. दिल्लीतील लोकांना जेवण नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही आणि पैसे नसल्याने शाळांची दुरवस्था झाली आहे, असे ते म्हणाले. नवीन जिंदाल यांनी अरविंद केजरीवाल यांनी आरोप चुकीचे सिद्ध करण्याचे आव्हानही दिले.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.