रायगड लोकसभा जागेसाठी भाजप आग्रही; आ. प्रशांत ठाकूर यांचे सुतोवाच

आगामी निवडणुकीत धैर्यशील पाटलांना पेण मतदार संघातून ७० हजार मतांची आघाडी देणार, आ. रवीशेठ पाटील

    06-Feb-2024
Total Views |
MLA prashant thakur in raigad bjp
 
पेण : मागील पाच वर्षात रायगडचे राजकीय समीकरण बदलले असून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, असे विधान भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रशांत ठाकूर यांनी केले. ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगडचा उमेदवार हा धैर्यशील पाटील हे भावी उमेदवार भाजपचा असल्याचे देखील आ. ठाकूर यावेळी म्हणाले.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असून आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे कुठेही उमेदवारी करणार नसल्याचे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी न करीता राज्यात लक्ष घालुन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना पेण मतदार संघातून ७० हजार मतांची आघाडी देण्याची घोषणा केली. तसेच विरोधी पक्षाकडे विकासाचा चेहरा नाही अशी टीका करीत विकास म्हणजे मोदी म्हणून भाजप विकासाचा चेहरा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्याकरिता मोदी सरकारने कोट्यवधी रुपये पाठवीले असून हर घर जल योजनेचे काम सुरू असून गावोगावी घरोघरी पाणी पुरवठा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
 
या प्रसंगी भाजपचे आमदार रवीशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील, भाजप- दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धर्यशील पाटील, रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कौशल्या पाटील, विजया मोहन पाटील, जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील, पेण विधानसभा मतदारसंघचे प्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.