दिल्लीत लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यास रेल्वे स्थानकावरून अटक

    06-Feb-2024
Total Views |
Lashkar e taiba Terrorist arrested in delhi
 
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. रियाझ अहमद असे आरोपी दहशतवाद्याचे नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे की या आरोपी दहशतवाद्याने एलओसी ओलांडून शस्त्रे आणि दारूगोळा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो देशाच्या राजधानीत कोणत्या उद्देशाने होता, हेही कळू शकलेले नाही. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

खुर्शीद अहमद राथेर आणि गुलाम सरवर राथेर यांच्यासोबत एलओसी ओलांडून दहशतवादी हँडलर्सकडून शस्त्रे आणि दारूगोळा मिळवण्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता. तो काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला पहाटे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि एक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपी रियाझ अहमद याला कायद्याच्या योग्य कलमांतर्गत अटक करण्यात आली असून जम्मू-काश्मीरच्या संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर पुढील आवश्यक कारवाईसाठी सूचित करण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.