कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

कोकण रेल्वे मार्गावर ०९ फेब्रुवारीला सकाळी ९ ते ११:३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक

    06-Feb-2024
Total Views |
Kokan Railway Megablock on 9th February

मुंबई :
कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशीराने धावणार आहेत.या ब्लॉकमुळे कोकणात जाणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांसह कोकण रेल्वेमार्गावरील अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडयाण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस शुक्रवारी सावंतवाडी रोड-कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.

- गाडी क्र. १२०५१ मुंबई छशिमट-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस शुक्रवारी रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.